MKCL नॉलेज फाउंडेशन (एमकेसीएल के एफ) या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे. हे सर्व भाग रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० एपिसोड्समध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे “टिलीमिली” मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल.

परंतु काही विद्यार्थ्यांना जर काही भाग बघता आले नाहीत तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या सहयोगाने मोबाईल अ‍ॅप ची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या अ‍ॅप वर रजिस्टर करून हा भाग पुन्हा पुन्हा बघण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक भागावर आधारित काही उपक्रम, कार्यानुभव तसेच प्रत्येक भागावर आधारित प्रश्नमंजुषा, स्वाध्याय पत्रिका आणि पूरक उपक्रमसुद्धा उपलब्ध असतील. ह्या कार्यानुभवाच्या आधारे विद्यार्थी प्रत्येक धड्यातील संकल्पना अजून चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतील. प्रसारित झालेला भाग हा दुसऱ्या दिवशी ह्या अ‍ॅपवर उपलब्ध केला जाईल.

आपल्याला ह्या सुविधेसाठी प्रत्येक इयत्तेसाठी रु. ३००/- प्रती सत्र असे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. ४ ऑगस्टपर्यंत सवलतीचा दर रु. २०० असेल. तसेच हे एपिसोडस् ३० एप्रिल २०२१ पर्यंत बघता येईल.

हे अ‍ॅप अँड्रॉईडच्या प्ले स्टोअर तसेच आयफोन च्या अ‍ॅप स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे.

खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये आपण हे अ‍ॅप कसे डाऊनलोड करावे तसेच कसे वापरावे ह्याचे सादरीकरण केलेलं आहे.

MKCL चे टिलीमिली अ‍ॅप येथून डाउनलोड करा.

मार्गदर्शक पुस्तिका