आपण प्रसारीत करीत असलेला टिलीमिली मालिकेचा प्रत्येक भाग मी आवडीने पाहत आहे. लॉकडाऊनच्या काळात आम्हासारख्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच आहे.

आदित्य घुले, ७ वी

You are creating great great program. My daughter enjoy this. She plays and learn also. Your concept is also good. Children don't know they're playing or learning. Thank you so much. Please continue this program.

Sachin Mhadalekar

प्रथम तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या मुलासाठी टिलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु केला. आमच्या मुलांना खुप आनंद वाटतो तो बघून अभ्यास करतांना.

दिनेश पवार

मी सह्याद्री वाहीनी वरील आमच्यासारख्या शाळकरी मुलांसाठी सुरु असलेला टिलीमिली हा कार्यक्रम मी नियमितपणे पाहतो त्यातील माझ्या सर्व विषयातील प्रकरणाची शिकवण्याची भाषा खुप सोपी व आत्मसात करण्याजोगी आहे इयत्ता सातवीचा वेळापत्रकाप्रमाणेच पाठाचे प्रक्षेपण झाल्यावर मी लगेच स्वाध्याय लिहतो. सदर चालु असलेला उपक्रम लॉकडाऊनच्या काळामध्येच नव्हे तर पुढेही हा उपक्रम चालु राहावा ही विनंती

आदित्य घुले

अतिशय सुंदर कार्यक्रम!!! आनंददायी, हसत खेळत शिक्षण!! हा कार्यक्रम पाहून विद्यार्थी नक्कीच आनंदात, हसतखेळत ज्ञान संपादन करत आहेत. आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा!!! धन्यवाद.

सौ.शशीकला मधुकर जागले

आपले टिली मिली मालिकेचे रोजचे भाग खुपच छान आहेत. मुलांचे पूर्वज्ञान जागृत करून मुलांकडून पाठाचा आशय कसा काढून घ्यावा हे छान समजले. आपण सुचविलेले उपक्रम सुध्दा सहज सोपे व उपयुक्त आहेत. खुपच छान मार्गदर्शन!

अमिता दीपक माळी

'टिलीमिली' या देखण्या मालिकेला आज आमच्या कुटुंबाने उत्स्फुर्त प्रतिसाद देत अनेक प्रश्नाची उकल ही केली. माझा देश स्वच्छ देश, अन कृषी प्रधान देश व उज्वल भविष्याच्या वेध, सुलभ आणि समजेल अशा भाषेत चित्रीकरण अन सादरीकणामुळे मुलांना ‘माणसाशी माणूस म्हणून कसा वागावं’ असा या मालिकेने दिलेला संदेश मला खूप आवडला. खूप छान वाटलं.

मीना थोटे कंधार (नांदेड)

खूप छान उपक्रम आहे आणि मी खूप उत्सुक असते टीलिमिली मालिकेसाठी.

दिशा लक्षण मोरे

या कोरोनाच्या संकट काळामध्ये हि मालिका म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानाची पर्वणीच आहे असे मला वाटते. विद्यार्थी देखील आनंदाने हि मालिका पाहतात अशा प्रतिक्रिया मला पालक वर्गामधून फोन द्वारे मिळाल्या आहेत तर काही पालकांनी किती आनंदाने विद्यार्थी अभ्यास करत आहेत याबाबतचे व्हिडीओ देखील मला पाठवले आहेत. आमच्या मुख्याध्यापक सर ज्ञानेश्वर गिते यांना देखील या गोष्टीचा आनंद आहे की या काळात माझे विद्यार्थी स्वतः च्या आरोग्याची काळजी घेऊन घरी राहून आनंदी शिक्षण घेत आहेत. शिक्षणापासून वंचित राहत नाहीत. मी मुख्याध्यापक जि प केंद्र प्राथमिक शाळा बळेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद, सह्याद्री वाहिनी व MKCL नॉलेज फौंडेशन चे व कार्यक्रम तयार करणाऱ्या सर्व टीम चे आभार मानतो. धन्यवाद. जे न देखे रवी म्हणजे सुर्य ते देखे टिली मिली.

सुर्यवंशी गणेश गोपिनाथ

आपला सहज व आनंददायी शिक्षण स्तुत्य उपक्रम आहे. आम्हा सर्व विशेष करून ग्रामीण भागात शिकविणाऱ्या शिक्षकांना पडलेले मोठे कोडं सुटले आहे आमच्या विद्यार्थ्यांना खूप हा कार्यक्रम खूप आवडला आहे ते सकाळी लवकर उठून आज आपल्याला नवीन काय ऐकायला मिळणार ह्याची वाट पाहतात पुन्हा आपल्याला खूप धन्यवाद देते आपण सर्वांनी सुरू केलेल्या या अभियानाला खूप यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते येथे प्रतिसाद थांबवते.

विद्या नाईक

टिली मिली सुरु करून आपण शिक्षण व्यवस्थेचा एक नवा अध्याय सुरु केला आहे. या कठीण परिस्थितीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण नेण्याची सामाजिक बांधिलकी MKCLने जपून एक नवीन आयाम CSR ला दिला आहे. केवळ अभ्यासक्रम नाही तर शिकायचे आणि शिकवायचे कसे हे सुद्धा सर्वजण शिकत आहेत. सर्वजण शाळा कशी, केव्हा, कुठे सुरु करायची या विवंचनेत असताना आपण अत्यंत कमी कालावधीत याचे सोल्युशन सुद्धा दिलेत. आपल्या या अभिनव उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद.

स्वाती हेरकळ, वाई